सराफा दुकानातून सुमारे 30 लाखांचे दागिने लंपास

On: May 9, 2022 12:14 PM

जळगाव : मुक्ताईनगर या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सराफा दुकानातून सुमारे तिस लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी रात्रीच्या वेळी लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात खळबळ माजली आहे.

मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रस्त्यावर अनिल शुरपाटणे यांंचे अंबिका ज्वेलर्स असून नेहमीप्रमाणे ते 8 तारखेला रात्री कामकाज आटोपून घरी गेले होते. आज सकाळी दुकान फोडल्याचे उघडकीस आले. 25 लाख रुपयांची चांदी तर 5 लाख रुपयांचे सोने या घटनेत लंपास करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment