अहमदनगर : राहुरी तालुक्यातील गुहा गावात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकत तिघा महिलांची सुटका केली आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कुंटनखाना चालविणा-या महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे.
सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर उप विभागीय पोलिस अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व त्यांच्या पथकाने कुंटणखान्यावर कारवाई केली. नगर मनमाड राज्य महामार्गालगत गुहा या गावी बॅंक ऑफ बडोदा नजीक हा कुंटणखाना सुरु होता. बनावट ग्राहकाच्या मदतीने हा छापा यशस्वी करण्यात आला. या छाप्यात दीड हजार रुपये रोख, 5 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुहा येथील महिलेविरुद्ध स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवण्यास घराची खोली उपलब्ध करुन देणे तसेच अनैतिक व्यापारास प्रतिबंध या कलमानुसार राहुरी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व त्यांचे सहकारी करत आहेत. तिन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.