अप्पर पोलिस अधीक्षक पथकाची जुगारावर धाड

On: May 11, 2022 9:45 AM

संग्रामपूर : तालुक्यातील कवठळ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर खामगावचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने सोमवार 9 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली.

या कारवाईत शुभम पाखरे, सुदर्शन अजने, गणेश पाखरे अशा तिघांना ताब्यात घेत त्यांच्या कब्जातून जुगार साहित्यासह 25 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटकेतील तिघांविरुद्ध तामगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment