अल्पवयीन मुलीसह तरुण डोंबीवली येथून ताब्यात

On: May 11, 2022 8:25 PM

जळगाव : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणा-या तरुणास डोंबीवली येथून मुलीसह ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणा-या अल्पवयीन मुलीस सम्राट कॉलनीत राहणा-या सचिन गुरुदास पाटील (21) या तरुणाने पळवून नेले होते. तपासात त्यानेच मुलीला पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोघांचा मागोवा घेत शिताफीने त्यांना शोधून काढत जळगावला आणले आहे.

या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरुवातीला एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात तरुणाविरुद्ध फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गु.र.न. 280/2022 भा.द.वि. 363 नुसार दाखल गुन्ह्यात 376 (एन) तसेच लैंगिक अपराधासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 4, 5 (एल), 6 व 12 प्रमाणे कलम वाढवण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स.पो.नि. प्रमोद कठोरे, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे, किरण पाटील व मपोकॉ सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेत दोघांना डोंबीवली येथून ताब्यात घेतले. गुन्हाकामी सचिन पाटील यास अटक करण्यात आली. त्याला न्या. श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 17 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. सदर गुन्हाचा पुढील तपास सपोनि प्रमोद कठोरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment