यवतमाळ : बनावट भारतीय चलन शहरात विक्री करणाऱ्या चौघांना एलसीबी पथकाने अटक केली आहे. यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर 10 मे रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. या घटनेत 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सय्यद वसीम सय्यद जमील (23) बिलाल नगर, कोहिनूर सोसायटी, वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा (27) रा. पाटील ले-आऊट, दानीश शहा तयब शहा (19) रा. सुंदर नगर, भोसा आणि शाकीब हमीद अकबानी (21) रा. मेमन कॉलनी, यवतमाळ अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पांढरकवडा मार्गावर सापळा रचण्यात आला होता. या सापळ्यात चौघांच्या संशयास्पद हालचाली बघता त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली. अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून 200 रुपयांच्या 89 बनावट नोटा मिळून आल्या. अधिक चौकशीत शहरातील मेमन कॉलनीतील शाकीब हमीद अकबानी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 200 रुपयांच्या 19 बनावट नोटा मिळून आल्या. या कारवाईत 200 रुपये किमतीच्या 108 बनावट नोटा, दोन मोटार सायकल, चार मोबाईल असा एकूण 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे, विवेक देशमुख, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, सागर भारस्कर, कर्मचारी बंडु डांगे, महंमद चव्हाण, हरिष राऊत, नीलेश राठोड, विनोद राठोड, सुधीर पिदुरकर, किशोर झेंडेकर, महेश नाईक, सलमान शेख, मोहम्मद भगतवाले, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी एलसीबी अधिकारी, कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये आणि सी नोट, जीएसटी प्रोत्साहनपर बक्षिस जाहीर केले आहे.