मोबाईल चोरट्यास अटक

On: May 12, 2022 8:41 PM

जळगाव : कॉल करण्याचा बहाणा करत मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. महेंद्र उर्फ भुरा बापु महाजन (21) रा.मोठा माळीवाडा, एरंडोल असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अटकेतील महेंद्र महाजन यास पुढील तपासकामी एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटकेतील आरोपीकडून सहा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना भगवान तुकाराम पाटील, पोना राहुल मधुकर बेसाणे, पोकॉ सचिन प्रकाश महाजन आदींनी या तपासात सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment