जळगाव : ट्रक लुटीच्या घटनेतील संशयीत महिला आरोपीस पारोळा पोलिसांनी अटक केली आहे. आठ दिवसात या गुन्ह्यातील तिन पुरुषांसह एक महिला अशा चौघांना पारोळा पोलिसांनी अटक केली आहे.
पारोळा शहरातून जाणा-या महामार्गवर 4 मे रोजी मध्यरात्री दोघा ट्रक चालकांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईलची लुट करण्यात आली होती. या घटनेच्या तपासात पारोळा पोलिसांनी काही तासातच स्थानिक तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात फरार असलेल्या महिलेस देखील अटक करण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. ज्योती गोपी पाटील असे संशयीत महिलेचे नाव आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव, महिला पोलिस कर्मचारी मोरे, पोलिस नाईक सुनील साळुंखे, संदीप सातपुते, पो.कॉ. किशोर भोई, राहुल कोळी, हेमचंद्र साबे, राहुल पाटील यांनी सहभाग घेतला.