पुणे : गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षकांनी खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रुपयांची लाच घेण्यास सहायक फौजदारास प्रोत्साहन दिले. दोन लाख रुपये लाचेच्या मागणीनंतर तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याघेण्याचा व्यवहार ठरला होता.
मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. पुणे एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात सहायक फौजदार आणि खासगी व्यक्ती असे दोघे अडकले. या कारवाईची खबर लागताच पोलिस निरीक्षक मात्र पसार झाला. प्रविण बाळासाहेब मोरे (50) असे फरार पोलिस निरीक्षकांचे नाव आहे. सहायक फौजदार कुतुबुद्दीन शेख गुलाब खान (52) आणि यासिन कासम शेख असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदाराची गॅस एजन्सी असून त्यावर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.