प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

On: May 15, 2022 6:42 PM

जळगाव : जुन्या वादातून धारदार शस्त्राने तरुणास जखमी करणा-या आरोपींच्या फरार साथीदारास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. रोहीत भिकन मराठे (19) रा. धोबी गल्ली, कासमवाडी जळगाव असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सुनिल राठोड आणि गौरव चौधरी या दोघा तरुणांमधे दस-याच्या दिवशी वाद झाला होता. या वादाच्या पार्श्वभुमीवर गौरवने एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे सुनिल राठोड, त्याचा भाऊ अनिल राठोड, रोहीत मराठे आणि अमन सोनवणे अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याबाबत कारवाई देखील झाली होती.

11 मार्च रोजी दुपारच्या वेळी रोजी अनिल राठोड घरी येत असतांना त्याच्या डोक्यावर सोनू गोपाल चौधरी याने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात तो जखमी झाला होता. यावेळी सोनू सोबत त्याचे इतर साथीदार देखील धारदार शस्त्रासह हजर होते. जखमी अनिल यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शुद्धीवर आल्यानंतर 14 मार्च रोजी अनिल राठोड याने दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा घडल्यापासून सर्व हल्लोखोर आरोपी फरार होते. त्यापैकी रोहित मराठे शहरात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुर वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील आदींनी कासमवाडी परिसर पिंजून काढत त्याला शोधून काढले. त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. जोशी यांनी त्याला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे व त्यांचे सहकारी किरण पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment