फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण

जळगव : जळगाव शहरातून जाणा-या खोटे नगर स्टॉप नजीक असलेल्या शिव फर्निचर या दुकानाला आज भल्या पहाटे पावणे तिन वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून महाबळ आणि गोलानी मार्केट येथील फायर स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती समजताच अग्नीशमन दलाचे बारा बंब घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी पाच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याकामी सहायक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, हेड फायरमन, अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, चालक संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे आदिंनी आगीवर नियंत्रण मिळवण्याकामी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here