जळगाव : तिस वर्षाच्या महिलेस गुंगी आणणारे शितपेय पाजून तिच्यावरील अनैसर्गीक अत्याचाराचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि एक महिलेचा संशयीत आरोपींमधे समावेश आहे.
साधारण एक वर्षापुर्वी घडलेल्या या घटनेत जामनेर तालुक्यातील एका महिलेसोबत अनैसर्गीक अत्याचार करण्यात आला होता. एका हॉटेलमधे करण्यात आलेल्या या अत्याचाराचा व्हिडीओ देखील तयार करण्यात आला होता. तो व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याचे देखील उघडकीस आले. याप्रकरणी पिडीत महिलेने जामनेर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या आधारे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.