जळगाव : जुन्या व जीर्ण झालेल्या रेशनकार्डाची नवीन दुय्यम प्रत मिळवून देण्याकामी संबंधीत तक्रारदार महिलेकडे चारशे रुपयांच्या लाचेची मागणी आणि स्विकार करणा-या खासगी इसमास आज जळगाव एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. पराग पुरुषोत्तम सोनवणे (39) रा. खोटे नगर जळगाव असे सदर खासगी इसमाचे नाव आहे. तक्रारदार महिलेचे रेशन कार्ड जीर्ण झाले होते. त्या जीर्ण रेशन कार्डाची नवीन दुय्यम प्रत महिलेस हवी होती. पुरवठा शाखेत बसलेल्या खासगी इसमाने पंचासमक्ष तक्रारदाराकडे याकामी चारशे रुपयांच्या लाचेची मागणी केली व स्विकार देखील केला. लाचेच्या रकमेचा स्विकार करताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने पराग सोनवणे यास ताब्यात घेत पुढील कारवाई केली.
जळगाव एसीबीचे पोलिस उप अधिक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव , पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.