गावठी कट्ट्यासह आरोपी ताब्यात

On: May 20, 2022 4:05 PM

जळगाव : नाशिक आयजी पथकासह चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या संयुक्त कामगिरीत जीवंत काडतुसासह गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. राजपालसिंग ज्योतसिंग बडोले (20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील सत्रसेन गावानजीक तिन हात नाक्याजवळ 19 तारखेच्या सायंकाळी सदर कारवाई करण्यात आली आहे. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment