मैत्रिणीची हत्या करणा-याने घेतला गळफास

On: May 21, 2022 9:53 AM

औरंगाबाद : मैत्रीणीला रुमवर बोलावून तिची निर्घृण हत्या करणा-या तिच्या फरार मित्राने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. रेणूका देवीदास ढेपे (19) असे हत्या झालेल्या मैत्रीणीचे तर शंकर हागवणे असे तिची हत्या करुन आत्महत्या करणा-या फरार मित्राचे नाव आहे. मित्र कामावर गेल्यानंतर रेणूका ढेपे या मैत्रीणीला रुमवर बोलावून शंकरने तिची हत्या केली होती. 

रेणूकाची हत्या केल्यानंतर 48 तासातच शंकरने मांडकी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ब्रिजवाडी येथे राहणा-या रेणूका व नारेगाव परिसरात भाजीपाला विकणा-या शंकरची मैत्री झाली होती. गेल्या बुधवारी त्याने तिला रुमवर बोलावले होते. शंकरचे मित्र रुमवर आल्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment