बहिणीच्या सासरी जावून भावाने केला गोळीबार

On: May 23, 2022 7:19 PM

उस्मानाबाद : बहिणीस सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्यामुळे संतापाच्या भरात भावाने तिच्या सासरी जावून वाद घालत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तुळजापुर तालुका परिसरात खळबळ माजली.

बहिणीस सासरी त्रास देत असल्याच्या कारणावरुन चिकुंद्रा ता. तुळजापूर येथील भाग्यवान लक्ष्मण गायकवाड यांनी 20 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बहिणीच्या सासरी बारुळ, ता. तुळजापूर येथील महादेव बळी मस्के यांच्या घरी येऊन वाद घातला. यावेळी भाचा सार्थक (13) हा त्याचे वडील महादेव मस्के यांची बाजू घेत असल्याने भाग्यवान यांनी संतापात सार्थकवर पिस्तूल मधून गोळी झाडली. त्यात सार्थकच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यास गोळी लागून तो जखमी झाला. महादेव यांचे भाऊ दिगंबर मस्के यांनी तुळजापूर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment