प्राणघातक हल्ल्यातील दुसरा आरोपी अटक

mayur bagade

जळगाव : जुना वाद मिटवण्याचा बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप असणा-या दुस-या संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. मयुर जमनादास बागडे रा. जाखनी नगर कंजरवाडा असे अटक करण्यात आलेल्या दुस-या संशयीत आरोपीचे नाव आहे. यापुर्वी आकाश अरुण दहेकर हा संशयीत आरोपी पोलिसांना अ‍ॅड. केदार भुसारी यांच्या माध्यमातून शरण आलेला आहे.

आकाश अजय सोनार या तरुणाने एमआयडीसी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार आकाश यास 3 मे रोजी मयुर बागडे याने रामनवमीच्या दिवशी झालेला वाद मिटवण्यासाठी कंजरवाडा परिसरात बोलावले होते. त्यानुसार आकाशसोबत ललित दिक्षीत, बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी असे सर्वजण तेथे गेले. त्यावेळी मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबु कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतरांनी त्यांच्यावर हल्ला केला. आकाश दहेकर याने बबलु धनगर याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला होता. मात्र तो हल्ला बबलु याने चुकवला. मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबू कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतर अनोळखी काही तरुणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात वाहनांचे देखील नुकसान झाले होते.

गुन्हा घडल्यापासून मयुर बागडे हा फरार होता. तो जळगाव शहरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, सचिन पाटील अशांनी रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्याला ताब्यात घेतले असून अटक केली आहे. त्याला न्या. सी. व्ही. जोशी यांच्या न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी तसेच किरण पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here