डोंबिवली एमआयडीसीत स्फोट

On: August 3, 2020 10:12 PM

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीत आज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता जास्त असल्यामुळे कंपनीचा परिसर मोठ्या प्रमाणात हादरला होता. या स्फोटाच्या हाद-यामुळे इतर दोन कंपन्यांचे देखील नुकसान झाले. आज रक्षा बंधन निमित्त कंपनीला सुटी होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पाच – सहा महिन्यापूर्वी या भागातील मेट्रोपोलिटन कंपनीला देखील भीषण आग लागली होती. आज पुन्हा आगीची पुनरावृत्ती झाल्यामुळे केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी पुढे आली आहे.

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment