जळगावचे अ‍ॅड. दर्जी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

जळगाव : राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्याचा तपास सुरु असतांना म्हाडा पेपरफुटी प्रकरणी जळगावचे अ‍ॅड. विजय दर्जी यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना पुण्याला घेऊन गेले आहेत. टीईटी घोटाळ्याचे कनेक्शन जळगावशी असल्याचे या अटकेतून निश्चित मानले जात आहे.   

अ‍ॅड. विजय दर्जी हे विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य असून जळगाव येथील गोलानी मार्केट मधे बालाजी प्लेसमेंट या नावाने त्यांची फर्म आहे. बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी ते सहकार्य करतात. टीईटी  घोटाळ्याची चौकशी सुरु असतांनाच म्हाडा पेपर फुटीचे प्रकरण पुढे आले. चौकशीअंती पुणे येथून आलेल्या पथकाने अ‍ॅड. दर्जी यांना अटकेनंतर पुणे येथे चौकशीकामी नेले आहे. सहायक आयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास व कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here