पोलीसांच्या तावडीतून पलायन करणा-यास अटक

On: May 27, 2022 9:49 AM

जळगाव : जिल्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी नेत असतांना पोलिसांच्या तावडीतून पलायन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला येथून ताब्यात घेत अटक केली आहे. महेश शिवदास दिक्षे रा.लोणी ता. रिसोड जि. वाशीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भुसावळ रेल्वे पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याच्या कारागृहात रवानगीचे आदेश दिले होते. पोलिस पथकाच्या निगराणीत त्याला उप कारागृहात नेत असतांना त्याने चतुराईने पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, पोकाँ विनोद पाटील, चा.पो.काँ. मुरलीधर बारी, चापोना अशोक पाटील आदींच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा सुरुवातीला वाशीम जिल्ह्यातील रिसोड व लोणी परिसरात शोध घेतला. तपासात पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्याला अकोला रेल्वे स्टेशनवर शिताफीने त्याब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment