अयोध्या : उद्या दुपारी 12.30 वाजता अयोध्या नगरीत प्रभु श्रीराम मंदिराच्या भुमीपुजनास सुरुवात होत आहे. राम की पौडी येथून दिपोत्सवाचे लाईव्ह अर्थात थेट प्रक्षेपण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ५ ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी अयोध्येत तिन तास थांबणार आहेत. दुपारी १२.३० वाजता भूमिपूजनाची सुरुवात होईल.
हा सर्व कार्यक्रम सव्वा तास चालणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संपुर्ण अयोध्या परिसर सिल करण्यात आला आहे. भूमीपूजन कार्यक्रम देशवासीयांना घरबसल्या बघण्यासाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. यासाठी ४८ हून अधिक अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे केवळ दूरदर्शन आणि एएनआयचे आहेत. दोघांच्या हायटेक एचडीओबी व्हॅन दाखल झाल्या आहेत. दूरदर्शन व एएनआयचे शंभराहून अधिक सदस्य आहेत.
कार्यक्रमाच्या ठिकाणी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमवेत विशेष पाहुण्यांच्या भुमीकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राहणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की कोरोनामुळे प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. ज्यांना आमंत्रण देण्यात आले आहे त्यांनीच कार्यक्रमाला यावे.