जळगाव : दारु, सोलुशन आणि इतर विविध नशा करणारे द्रव प्राशन केल्यानंतर वाहनांची जाळपोळ करणा-या तरुणास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. आकाश गणेश महाजन तांबापुरा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या नशेखोर तरुणाचे नाव आहे.
दि.13/5/2022 चा पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास डी मार्टच्या पाठीमागे असलेल्या आदर्शनगर भागात चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगमधील एकूण सहा मोटारसायकल व दोन चार चाकी वाहने अज्ञात व्यक्तीने जाळून सुमारे अठरा लाख रुपायांचे नुकसान केले होते.
गाडी मालकांच्या भावना व संवेदना अतिशय तीव्र होत्या. कुणाशी कुणाचे वैर नसतांना वाहन मालकांच्या वाहनांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसानीला जबाबदार तरी कुणाला धरायचे व त्याने असे नुकसान का केले? असा सर्वांना प्रश्न पडला होता. पोलीसांपुढे या तपासाचे मोठे आव्हान होते. पंधरा दिवसांत या तपासावर सतत काम करून या गुन्ह्याची उकल रामानंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमने केली आहे. यातील आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघड करण्यात यश आले आहे.
आकाश गणेश महाजन वय 21 वर्ष, रा.तांबापुरा यास गुन्ह्यात अटक केली आहे. दारु व सोलूशन तसेच इतर वेगवेगळ्या नशा केल्यावर तो असे कृत्य करत असल्याची माहीती त्याच्याकडून मिळाली आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिक्षक डाॅ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शन लाभले.
.