डॉक्टरांना झाली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

On: August 4, 2020 11:38 AM

नाशिक : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला असतांना वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आपआपल्या परिने रुग्णसेवा करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना कोरोना योद्धा संबोधण्यात येत आहे. असे असले तरी नाशिक येथील ग्लोबल हॉस्पीटल मधील डॉक्टरांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून या घटनेचा आयएमए सह सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. सिडको येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोविड-19 संशयित रुग्णाचा 3 ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे शोकसंतप्त नातेवाईकांनी थेट डॉक्टरांनाच मारहाण करण्याचा प्रकार घडला. संतप्त नातेवाईक थेट डॉक्टरच्या केबिनमध्ये आले. त्यांनी रुग्णाचा वैद्यकीय रिपोर्ट दाखवत रुग्णाच्या मृत्यूची चौकशी सुरु केली. रुग्णाच्या मृत्यूचे कारण डॉक्टर सांगण्याचा प्रयत्न करत असतांना अचानक नातेवाईकांनी त्यांना मारहाण सुरु केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनला तिघा आरोपींवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच तिघा आरोपींना अटकेसह सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment