अल्पवयीन मुलीचा पस्तीशीच्या तरुणासोबत बालविवाह

On: May 30, 2022 10:56 AM

अमरावती : वलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील गावात एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत 35 वर्ष वयाच्या तरुणासोबत बालविवाह झाल्याची घटना उघडकीस आली आहे. केवळ पैशाच्या आमिषातून मुलीच्या वडीलांनी त्यांच्या मुलीचा बालविवाह केल्याचे स्पष्ट होत आहे. लग्नानंतर दिड महिन्याच्या कालावधीत जबरीने लैंगिक शोषण झाल्याची तक्रार पिडीत मुलीने पोलिसात दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तरुणीने हा प्रकार अगोदर बाल कल्याण समितीकडे कथन केला. त्यानंतर हे प्रकरण वलगाव पोलिस स्टेशनला गेले. बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोस्को तसेच बलात्काराच्या कलमानुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह अकोला जिल्ह्यात झाला असल्यामुळे सदर गुन्हा अकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment