घरफोडी करणारा सायबू शेख अटकेत

On: May 30, 2022 10:11 PM

जळगाव : नऊ ते दहा महिन्यापुर्वी नशीराबाद पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणा-या अट्टल घरफोड्यास जळगाव शहरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. सायबुद्दीन उर्फ सायबू शेख नजमोहीन रा. परपोट मोहल्ला नशिराबाद असे अटकेतील घरफोड्याचे नाव असून त्याने नशिराबाद येथे केलेल्या घरफोडीची कबुली दिली आहे. त्याला जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोहेकॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, प्रितम पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, नितीन बाविस्कर, चालक पो.हे.कॉ. भरत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment