बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांतसिंह राजपूत याच्या कथित आत्यमहत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येमुळे विविध आरोप – प्रत्यारोप, तर्क वितर्क लावले जात आहे. या आरोपांसह तर्क वितर्कांमुळे बॉलीवुडसह राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. रिया चक्रवर्तीने केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीबाबत ईडीने लक्ष घालण्यास सुरुवात केली दरम्यान बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढल्याचा आरोप आहे. या आरोपाकडे मुंबई पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांच्या कालावधीत सुशांतच्या बॅंक खात्यात जवळपास 50 कोटी रुपये आले होते. ते सर्व पैसे काढण्यात आले आहे. केवळ एका वर्षात 17 कोटी आले आणि त्यातील 15 कोटी काढण्यात आल्याचे कारण तपास करण्यासाठी पुरेसे आहे. यामुळे आता बिहार पोलीस विरुद्ध बिहार पोलिस असे वळण या प्रकरणाला लागले असल्याचे बोलले जात आहे.