भुसावळ : भुसावळ शहर परिसरात काही दिवसांपुर्वी मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुशंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशन गुन्हे अन्वेशन पथकाच्या कर्मचा-यांचे तपासकाम सुरु होते. या प्रकरणी एका चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिस पथकाने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग ५, गुरनं.०७६२/२०२० भा.द.वि. ३७९ नुसार तर भुसावळ शहर पोलीस स्टेशनला भाग ५ गु.र.न. ०३९७/२०२० भा.द.वि. ३७९, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी समाधान गोकुळ सपकाळे (२८) रा.कोळीवाडा, फुकणी ता. जि.जळगाव (ह. मु.तुकाई दर्शन,हडपसर,जि.पुणे) यांस मध्यरात्री २ वाजता सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून ३५ हजार रुपये किमतीची पॅशन प्रो व ३० हजार रुपये किमतीची होंडा ड्रीम युगा यासह जळगाव येथून चोरलेला १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,पो.हे.कॉ.सुनील जोशी,पो.ना. रमण सुरळकर,रविंद्र बिऱ्हाडे, उमाकांत पाटील,किशोर महाजन, समाधान पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख,चालक पो.हे.कॉ.अशोक पाटील यांनी या तपासकामी कारवाई केली.