सामान चोरी करणा-या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा

On: June 1, 2022 10:01 PM

जळगाव : एमआयडीसी परिसरातील स्टार फॅब्रिकेटर्स या कंपनीत सुरक्षा रक्षकाने सामानाची चोरी केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिष नाना बाविस्कर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. कंपनीत लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी करत असतांना सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

सेक्टर जे – 22 या परिसरात स्टार फॅब्रिकेटर्स नावाची कपनी असून या कंपनीच्या सुरक्षेसाठी  खान्देश अॅकडमी सेक्युरीटी सव्हीसेस या एजन्सीला ठेका देण्यात आला आहे. या एजन्सीमार्फत सतिष नाना बाविस्कर या सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही देखील बसवले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी कंपनीचे सुपरवायजर धीरज वानखेडे हे करत असतात. 10 मे 2022 रोजी झालेल्या घडामोडीचे फुटेज तपासत असतांना त्यात सुरक्षा रक्षक सतिष नाना बाविस्कर याने कंपनीतील सामानाची चोरी केल्याचा प्रकार आढळून आला. इलेक्ट्रीक बोर्ड  तयार करण्यासाठी लागणा-या प्रेस टुल डाईज व इतर किरकोळ भंगार सामान त्याने रिक्षा चालकाच्या मदतीने रिक्षात ठेवून नेत असल्याचे दिसून आले. सुमारे नव्वद हजार रुपयांच्या सामानाची चोरी केल्याप्रकरणी सुपरवायझर धिरज वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस नाईक सुधीर साळवे व सचिन पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment