इगतपुरी येथील हत्येप्रकरणी चाळीसगावातून दोघांना अटक

On: June 2, 2022 11:50 AM

जळगाव : इगतपुरी येथील रेल्वे तलावावर 22 मे रोजी आंघोळीसाठी आलेल्या तरुणाची हत्या झाली होती. या हत्येतील संशयीत आरोपी चाळीसगाव येथे आला असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना समजली.

त्या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहरातील बामोशी बाबा दर्गा परिसरातील झोपडीतून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जुबेर मुन्वर पिंजारी (25) व त्याची पत्नी बसंती जुबेर पिंजारी (24), दोन्ही रा. धुळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे पती पत्नी धावत्या रेल्वेत गाणी म्हणून मिळालेल्या पैशावर आपला उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे. इगतपुरी येथील तरूण आपला मुलगा आणी भाचा यांच्यासह अंघोळीसाठी रेल्वे तलावावर गेला होता. त्यावेळी तेथे दोन तरुणी व दोन ते तीन तरुण दारु पित बसले होते. त्यातील दोघांनी तरुणाच्या मानेवर चाकूचे वार केले होते. त्यात तरुणाचा मृत्यु झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment