जळगाव : यावल तालुक्यातील बोराळे या गावात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावात विज, पाणी पुरवठा या दोन महत्वाच्या घटकांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले असल्याबाबत ग्रामस्थांची तक्रार आहे.
या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र ग्रामपंचायत फारसे गांभिर्याने ग्रामस्थांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. गावातील मुख्य रस्त्याजवळ गटारीची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या नाही तर ग्रामपंचायतीसमोर संवैधानिक मार्गाने आंदोकन छेडले जाणार असल्याचे संविधान रक्षक दल भीम आर्मी यावल तालुका संघटक राजु वानखेडे यांनी म्हटले आहे.