अश्लील व्हिडिओ प्रकरणी पोलिसाचे निलंबन

On: June 3, 2022 9:55 AM

नंदुरबार : अश्लील व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून खंडणी मागणा-या महिलेसह शहरातील तथाकथित पत्रकार अतुल रामकृष्ण थोरात (चौधरी) व पोलिस हवालदार छोटूलाल तुमडू शिरसाठ अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांना सात दिवस पोलिस कोठडीत रवनगीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पोलिस हवालदार छोटूलाल शिरसाठ यास पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी निलंबीत केले आहे.

नंदुरबार शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला देखील सदर महिलेसह तिच्या दोघा महिला साथीदारांसह तथाकथित पत्रकार अशांनी मिळून दोन महिन्यापुर्वी छेडखानीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. या धमकीत पाच लाख रुपयांची खंडणी सदर बांधकाम व्यावसायीकास मागण्यात आली होती. याप्रकरणी नदुरबार शहर पोलिस स्टेशनला महिलेसह तिच्या दोन महिला साथीदारांसह तथाकथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे बदनामीची भिती दाखवून कुणी खंडणी मागत असल्यास तक्रारदाराने समोर येण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment