धुळे : धुळे शहरात सावकारी करणा-या राजेंद्र बंब यांच्या अजुन एका लॉकरची तपासणी पोलिसांनी केली असता त्यात अजून 10 कोटी 73 लाख रुपयांचे घबाड आढळून आले आहे. या घबाडामधे 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपये रोख स्वरुपात आढळून आले. याशिवाय 10 किलो 563 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, 67 सोन्याचे बिस्कीट, 5 लाख 14 हजार 911 रुपये किंमतीची 7 किलो 621 ग्रॅम वजनाची चांदी आढळून आली आहे. शुक्रवारी त्यांच्या शिरपूर को ऑप बॅकेतील लॉकर उघडल्यानंतर हा खजीना आढळून आला. सलग तिस-या दिवशी करण्यात आलेल्या या कारवाईत 58 विदेशी चलन देखील आढळून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
धुळे शहरात सावकारी करणारे राजेंद्र बंब याच्याकडे गेल्या तिन दिवसांपासून टाकण्यात आलेल्या धाडीत पोलिसांना कुबेराचा खजिना आढळून आला आहे. राजेंद्र बंब सध्या पोलिस कोठडीत आहेत. पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या निर्देशाखाली उपअधीक्षक ईश्वर कातकडे, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी हेमंत बेंडाळे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बधीर, कर्मचारी हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भुषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर आदी या कारवाईच्या वेळी उपस्थित होते. उपनिबंधक मनोज चौधरी व त्यांचे सहाकारी देखील यावेळी हजर होते.