ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

On: August 4, 2020 8:19 PM

नवी दिल्ली : सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या सी.ए.ची चौकशी केली जात आहे. सदर चौकशी मुंबईतील ईडी शाखेत सुरु आहे. अंमलबजावणी संचालनायाला सी.ए. रितेश शहा यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत.

सुशांतच्या कथित आत्महत्येप्रकरणी बिहार सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर बिहार पोलिस त्याचा तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, जर सुशांतच्या वडिलांना हवे असेल तर या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल. या आधारे बिहार सरकारने शिफारस केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment