प्राणघातक हल्ल्यातील दोघा फरार संशयितांना अटक

जळगाव : बहिणीचे नाव का घेतले अशी विचारणा केल्यानंतर तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघा फरार संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून दोघे संशयित आरोपी फरार होते. योगेश कोळी व निलेश राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

17 मे 2022 रोजी रात्री साडे अकरा वाजता रोहन घुले या तरुणास योगेश कोळी, निलेश राजपूत व त्यांच्या दोघा साथीदारांनी रस्त्यात अडवले होते. माझ्या बहिणीचे नाव का घेतले अशी विचारणा केल्यानंतर योगेशने रोहन घुले यास मारहाण केली होती. निलेश राजपूत याने त्याच्याजवळ असलेल्या चाँपरने रोहन याच्यावर प्राणघातक हल्ला केला. बरगडी व कमरेच्यामधे तिन ते चार ठिकाणी घाव बसल्यामुळे रोहन जबर जखमी झाला होता. इतर दोघांनी रोहनला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून योगेश आणि निलेश फरार होते.

दोघे जण भुसावळ येथे असल्याची माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, नाना तायडे, चेतन सोनवणे आदींच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली. दोघांना आर. वाय. खंदारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 8 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अनिस शेख व दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here