दगडी खलबत्त्याने ठेचून औरंगाबादेत विवाहितेची हत्या

On: June 6, 2022 1:36 PM

औरंगाबाद : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून किचनमधील दगडी खलबत्याने ठेचून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी सातारा पोलिस स्टेशनला संशयीत पतीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्र पिराजी पिट्टेकर (55) असे पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पतीचे तर बिल्किस उर्फ मीना पिट्टेकर असे मयत विवाहितेचे नाव आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरात रविवारी घडलेल्या या घटनेतील पती पत्नीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केला आहे. खून करुन फरार झालेल्या मच्छिंद्रने मोबाईल घरीच ठेवून पलायन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment