विरोधकांना अश्लिल व्हिडीओ पाठवण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी

On: June 10, 2022 10:23 AM

जळगाव : अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन वाहन चालक तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर अश्लिल आणि खून झालेल्या रक्तबंबाळ इसमाचा व्हिडीओ पाठवणा-या अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासोदा येथील तरुणाच्या मोबाईलवर फेब्रुवारी 2021 ते 8 जून 2022 या कालावधीत एका अज्ञात मोबाईलधारकाने मेसेजेस व चॅटींग करुन त्याच्या मनात उत्तेजक भावना निर्माण केल्या. तसेच खून झालेल्या रक्तबंबाळ इसमाचा व्हिडीओ देखील पाठवला. अशा स्वरुपाचा मृत्यू घडवून आणेन अशी धमकी देत त्याला एक अर्धनग्न व्हिडीओ सोबतीला पाठवण्यात आला. सदर अर्धनग्न व्हिडीओ निवडणूकीतील विरोधी पक्षाला पाठवून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. व्हिडीओ व्हायरल करण्याचे काम रोखण्यासाठी पलीकडून चॅटींग करणा-या व्यक्तीने वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्याच्या धमकीला घाबरुन कासोदा येथील चालक तरुणाने त्याला फोन पे च्या माध्यमातून अनुक्रमे 15 व 2 हजार असे एकुण 17 हजार रुपये पाठवले. त्यानंतर देखील पलीकडून चॅट करणा-या अज्ञात मोबाईलधारकाने वारंवार पैशांची मागणी सुरुच ठेवली. त्यामुळे त्रस्त झालेल्या चालक तरुणाने सायबर पोलिस स्टेशन गाठत आयटी अ‍ॅक्टसह विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली. पो.नि. लिलाधर कानडे पुढील तपास करत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment