जळगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेने अवैध लाकुड वाहतुक रोखण्यात यश आले आहे. या कारवाईत पकडण्यात आलेल्या चौघा वाहनांसह चालकांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चंदन तस्करी करणारी चार संशयीत वाहने चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतून 10 जून रोजी मार्गस्थ होणार असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि.संजय ठेंगे यांना समजली होती. चौघा वाहनांपैकी कोणत्यातरी एका वाहनातून चंदन तस्करीची दाट शक्यता असल्याची देखील माहिती त्यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे 10 जून रोजी तिन पथकांची निर्मीती करण्यात आली होती. वाघाडी रोड, मालेगाव रोड आणि धुळे रोड या मार्गांवर तिन पथके तैनात करण्यात आली. चौघा संशयीत वाहनांची तपासणी केली असता त्यातील दोन वाहनांमधे निंब आणि दोन वाहनांमधे निंबासह बाभळीची लाकडे आढळून आली.
पो.नि.संजय ठेंगे यांच्या पथकातील स.पो.नि. रमेश चव्हाण, स.पो.नि.डी.व्ही. सुंदरडे, पोलिस नाईक गोवर्धन बोरसे, शांताराम आमोदकर, संदीप पाटील, नितीन आमोदकर, हे.कॉ. युवराज नाईक, ज्ञानेश्वर बडगुजर, देवीदास पाटील, नदू परदेशी संतोष शिंदे, मनोहर पाटील व अनिल अगोने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.