पिडीत पत्नीची व्हिडिओच्या माध्यमातून मदतीची याचना

On: June 12, 2022 12:04 PM

नाशिक : पतीचे विवाहबाह्य संबंध लक्षात आल्याने जाब विचारणा-या पत्नीवर अनैसर्गीक अनैसर्गिक अत्याचारासह तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी संशयित पतीविरुद्ध मुंबईनाका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने समाज माध्यमांवर व्हिडीओ टाकत आपबिती कथन केली असून मदतीची याचना देखील केली आहे.

पीडित विवाहिचे सन 2003 मधे अत्याचार करणा-या पतीसोबत लग्न झाले. त्याचे पिडीतेसोबत दुसरे लग्न आहे. लायटींग विक्रीचा व्यवसाय करणा-या पतीचे विवाहाच्या आधीपासून परस्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे तिला सन 2010 मधे समजले. तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीप मधे राहतो. आपल्या मुलांसह पीडिता भाड्याच्या खोलीत रहात असून पती तिला नांदवण्यास तयार नसल्याने तिने समाज माध्यमात व्हिडीओच्या माध्यमातून आपला भावना व्यक्त केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment