भर पावसात लागलेल्या आगीवर नियंत्रण

On: June 12, 2022 10:52 PM

जळगाव : आज दुपारी एसटी वर्कशॉपच्या मागील परिसरात भंगार व अडगळीच्या वस्तूंना अचानक आग लागली. पाऊस सुरु असतांना देखील आगीचा प्रकोप लवकर कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती.

घटनेची माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आल्यानंतर आग विझवण्यासाठी दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्यासह फोमचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. अग्निशमन दलाचे जवान भारत बारी, रविंद्र बोरसे, वाहन चालक-युसुफ पटेल, नंदकिशोर खडके, मोहन भाकरे, नितीन बारी आदींनी याकामी सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment