नोकराने तयार केला महिलेचा आक्षेपार्ह व्हिडीओ

On: August 5, 2020 6:12 PM

नागपूर :  नागपूरच्या अजनी भागात एक धक्कादायक प्रकार उघड झाल्याने खळबळ माजली आहे. घरातील महिलेचा त्यांच्या नोकराने आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला. नंतर आक्षेपार्ह मागणी करत तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्या नोकराने महिलेला दिली. त्याच्या या मागणीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने पोलिसात रितसर गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरच्या अजनी भागात राहणा-या या महिलेचे पती सीए आहेत. त्यांच्याकडे चेतन खडतकर हा कामाला आहे. सीए यांच्या घरातच त्यांचे कार्यालय आहे. त्यामुळे चेतनचा त्यांच्या घरात नेहमी वावर होता. काही दिवसांनी चेतन सीएच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करु लागला.

6 जुलै रोजी स्नानसंध्या करत असतांना चेतन याने आपला व्हिडीओ तयार केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करायचा नसेल तर आक्षेपार्ह मागणीचे धमकीपत्र संगणकावर दिल्याचे देखील महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर महिलेने आपल्या पतीसह पोलिस स्टेशन गाठत रितसर गुन्हा दाखल केला. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment