ऑर्डरविना महिलांच्या अंतर्वस्त्रांची होम डिलीवरी – किराणा दुकानदार त्रस्त

On: June 14, 2022 10:15 AM

जळगाव : कुठलीही ऑनलाईन ऑर्डर दिली नसतांना कॅश ऑन डिलीवरी स्वरुपातील महिलांची अंतर्वस्त्र घरपोच येत असल्यामुळे जामनेर येथील रहिवासी किराणा दुकानदार हैरान झाला आहे. आपल्या नावाचा कुणीतरी अज्ञात इसमाने बनावट ई मेल आयडी तयार करुन आपल्या नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकाचा वापर करुन हा खोडसाळपणा केला असल्याचे सदर त्रस्त इसमाच्या लक्षात आले.

या प्रकरणी जामनेर शहरातील त्रस्त तक्रारदाराने जळगावला सायबर पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध रितसर तक्रार दाखल केली आहे. विना ऑर्डर डिलीवरी व ती देखील महिलांच्या अतर्वस्त्रांची आणि कॅश ऑन डीलीवरी स्वरुपातील असल्यामुळे तक्रारदार चांगलाच बेजार झाला आहे. मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत हा प्रकार घडलेला आहे. पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment