मोटार सायकल चोरट्यांना अटक

On: June 14, 2022 9:17 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकल चोरट्यांना आज अटक केली आहे. तुषार संतोष सपकाळे (22) व तेजस विकास सपकाळे (20) दोघे रा.अंजाळा ता. यावल अशी अटकेतील दोघा चोरट्यांची नावे आहेत. चोरीच्या मोटार सायकल खरेदी करणारा त्यांचा साथीदार राहुल शाम मोरे (20) रा. हनुमंतखेडा ता. एरंडोल याला देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

अंजाळा ता. यावल या गावी तुषार संतोष सपकाळे व तेजस विकास सपकाळे हे दोघे मोटार सायकल चोरी करुन त्या कमी किमतीत विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, महेश आत्माराम महाजन, पोना नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, भगवान तुकाराम पाटील चापोकॉ अशोक युवराज पाटील आदींचे पथक अंजाळा ता. यावल येथे रवाना झाले होते. दोघांना शिताफीने ताब्यात घेतल्यानंतर चोरीच्या मोटार सायकल खरेदी करणा-या राहुल मोरे याचे देखील नाव पुढे आले. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर फैजपूर आणि यावल येथील चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या. तिघांना यावल येथील चोरीच्या गुन्ह्यात मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment