हॉटेलमालकास मारहाण करणा-या मद्यपींसह इतरांविरुद्ध गुन्हा

On: June 15, 2022 4:05 PM

जळगाव : दारु पिऊन हॉटेलमधे उलट्या करणा-या ग्राहकास हॉटेल मालकाने बाहेर काढल्याचा ग्राहकास राग आला. त्यामुळे संतप्त ग्राहकाने गैरकायद्याची मंडळी जमा करुन हॉटेल मालकासह इतरांना लाठ्या काठ्या व फायटरने मारहाण केल्याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर शहराबाहेर कोदोली रस्त्यावरील हॉटेल दाजीबा येथे 14 जून रोजी हा प्रकार घडला. हॉटेल मालक प्रमोद रामकृष्ण कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजु पांचाळ, दगडू पांचाळ व इतर सात ते आठ जणांविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक योगेश महाजन पुढील तपास करत असून अद्याप संशयीत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment