अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

जळगाव : अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आज विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात व फुलांचा वर्षावाने स्वागत करण्यात आले. स्माईली पेन्सिलचे वाटप करण्यात आले. कोरोनानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

अनुभूती स्कूलमधील मुख्याधपकांसह सर्वच शिक्षिक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. शाळेत पहिल्या दिवसापासून हसत-खेळत शिकता यावे यासाठी अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या समाजकल्याणाच्या विचारधारेतुन विविध शैक्षणिक उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस कायम स्मरणात राहवा यासाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतुन आजचा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वीसासाठी शिक्षक शिक्षेतर इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here