तरुणीची दोन लाखात विक्री व अत्याचार

On: June 16, 2022 10:24 AM

जळगाव : दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यामधून गुंगीचे औषध देत तरुणीला पळवून नेत तिची दोन लाखात लग्नासाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पळवून नेलेल्या तरुणीला जीवे ठार करण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचे देखील उघड झाले आहे. या घटनेप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला एकुण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अनोळखी महिलांसह राकेश भगीरथ वर्मा (न्हावी), शामु भगीरथ वर्मा, भगीरथ वर्मा, कमल भगीरथ वर्मा, दिनेश भगीरथ वर्मा, तेजू, अशी गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांची नावे आहेत.

याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला पाल ता. रावेर येथील पंचवीस वर्षाच्या पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 213/22 भा.द.वि. 366, 328, 342, 376,(2)(एन), 323, 506, 34 सह अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा कायदा 2015 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर पोलिस उप अधिक्षक कुणाल सोनवणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment