बहिणीची हत्या करुन आत्महत्येचा बनाव उघडकीस

On: June 17, 2022 12:35 PM

धुळे : बहिणीचे प्रेम प्रकरण लक्षात आल्याने भावानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तिने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा भावाचा बनाव देखील पोलिस तपासात उघड झाला आहे. ऑनर किलींगच्या या घटनेने साक्री तालुक्यात खळबळ माजली आहे.

13 जून रोजी भल्या पहाटे साक्री तालुक्यातील हट्टी गावातील पुष्पा हालोर या तरुणीवर संशयास्पद अंत्यसंस्कार झाल्याचा प्रकार झाला होता. घातपाताच्या या घटनेबाबत निजामपूर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी श्रीकांत पाटील यांना समजले होते. निजामपूरपासून 24 किमी अंतरावरील या गावात अंत्यसंस्कार झालेल्या तरुणीचा भाऊ संदीप रमेश हालोर याची चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. लहान बहिणीचे प्रेम प्रकरण घरात समजल्यानंतर आपणच तिची हत्या केल्याचे त्याने कबुल केले. हत्येनंतर तिला झाडाला लटकावण्यात आले. तिने आत्महत्या केल्याचे भासवण्यात आले. गुन्हा कबुल केल्यानंतर संदीप हालोर याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment