खूनाच्या गुन्हयातील सोळा वर्षापासून फरार बंदीस अटक

On: June 17, 2022 7:43 PM

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यात अपील जामीनावर सुटलेल्या सोळा वर्षापासून फरार बंदीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रदिप सोनु मेढे (58) रा. वंजारी टेकडी, समतानगर, जळगाव असे सन 2006 पासून फरार असलेल्या व आता अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आरोपी प्रदीप सोनु मेढे यास खूनाच्या गुन्ह्यात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. फरार बंदी असलेल्या प्रदीप मेढे याने उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे अपील केले असता उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी त्याची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्यानंतर सन 2006 मध्ये तो अपील जामीनावर सुटला. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याची शिक्षा कायम ठेवली होती. तो न्यायालयात हजर झाला नाही. तेव्हापासून तो फरार होता. त्याला न्यायालयात हजर करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment