धुळे : धुळे शहरातील नगावबारी परिसरात एका पाणीपुरी विक्रेत्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. आसिफ प्यारेलाला खाटीक प्लॉट क्रं. 31 प्रियदर्शनी नगर धुळे असे सदर पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. पश्चिम देवपुर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरात देखील गेल्या काही महिन्यात एका पाणीपुरी विक्रेत्याकडे गावठी कट्टा आढळून आला होता.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील यांच्या पथकाने त्याला विस हजार रुपये किमतीच्या कट्टा आणि दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, हे.कॉ. संजय पाटील, अशोक पाटील, संदीप सरग, रवींद्र माळी, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.