महिला पोलिसाने भुमिका साकारली प्रेयसीची!— घरफोड्याला दाखवली हवा पोलिस कोठडीची

On: June 19, 2022 12:16 PM

नागपूर : गर्लफ्रेंड ही घरफोड्याची कमजोरी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला सापळा रचून पकडण्यात आले. याकामी महिला पोलिसाने त्याच्याशी गोड बोलण्याचे नाटक करत त्याच्या प्रेयसीची भुमिका साकारत त्याला जेरबंद करण्यात आले. नागपुरात हा प्रकार घडला असून घरफोड्यासह त्याच्या दोघा अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. अंकेश उर्फ टोबो रामसिंह पाल असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव आहे.

नागपुरातील सहकार नगरातील संजय रतनकुमार चौधरी यांच्या कंपनीत अंकेश उर्फ टोबो पाल या घरफोड्याने लाखो रुपयांच्या मालाची चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तासनतास बोलत असतो ही बाब पोलिसांनी हेरली होती. गर्लफ्रेंड ही टोबो या आरोपीची कमजोरी असल्याचे लक्षात आल्याने त्याला त्याच्याच पद्धतीने जेरबंद करण्याचे पोलिस पथकाने ठरवले.

महिला पोलिस कर्मचा-याने त्याच्याशी लाडीक गप्पा करुन त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. महिला पोलिस कर्मचा-याचा गोड आवाज ऐकून टोबोने महिला पोलिस कर्मचा-याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. त्याच्याशी लाडीक संवाद साधून त्याला लोकमान्य नगर मेट्रो स्थानक परिसरात भेटण्यासाठी बोलावण्यात आले. दरम्यान एमआयडीसी पोलिसांचे पथक परिसरात साध्या वेशात दबा धरुन बसले होते. महिला पोलिस कर्मचा-याला भेटण्यासाठी घरफोड्या टोबो येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment