गुन्हेगारांना नशेच्या गोळ्या पुरवणा-या दुकानदारास अटक

On: June 19, 2022 12:55 PM

औरंगाबाद : रेकॉर्डवरील गुन्हेगारांना नशेच्या गोळ्या पुरवणा-या मेडीकल दुकानदारासह दोघांना औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शिव मेडिकल या दुकानाचा मालक शिवप्रसाद सुरेश चनघटे (24) याच्यासह खरेदीदार तारासिंग जगदीशसिंग टाक (20) व एका मेडीकल दुकानावर काम करणारा आणि नशेच्या गोळ्या पुरवणारा महेश उनवणे (29) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. डमी ग्राहकाच्या माध्यमातून रचण्यात आलेल्या सापळ्याच्या माध्यमातून सदर कारवाई करण्यात आली.

तिघांकडून नशेच्या 2048 अल्फाईलोम, 3 हजार 712 सिल्डनाफिल गोळ्या, तर 228 एमटीपी किट जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेतील व रेकॉर्डवरील गुन्हेगार तारासिंग टाक हा शस्त्रांना धार लावण्याचे काम करत असतो. स्थानिक गुन्हे शाखेचे गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार भंडारे, अंमलदार सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहूळ, प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभाळकर यांनी अन्न औषधी निरीक्षक बळीराम मरेवाड, अंजली मिटकर यांच्या मदतीने सदर कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment