जळगाव : रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला मावशी का म्हटले या कारणावरुन चौघांनी एकाला शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेप्रकरणी मारहाण झालेल्या इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघा अज्ञात इसमांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनराज रामकृष्ण वाघ रा. कंकराळा ता. सोयगाव जि. औरंगाबाद हे शेतकरी जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात उभे होते. त्यावेळी अज्ञात चारचाकी वाहनातील अज्ञात तिघांसह रस्त्यावरील एका अज्ञात इसमाने धनराज वाघ यांना शिवीगाळ व मारहाण सुरु केली. त्या बाईला मावशी का म्हटले या कारवावरुन सदर शिवीगाळ व मारहाण त्यांना करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हे.कॉ. संजय नारखेडे पुढील तपास करत आहेत.